मुंबई : महापारेषणच्या वार्षिक दैनंदिनी, प्लॅनर-२०२५ चे प्रकाशन करताना महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, शेजारी संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर, संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे, कंपनी सचिव विनीता श्रीवाणी, मुख्य अभियंता श्री. सुनील सूर्यवंशी, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री. नागसेन वानखेडे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाड, श्री. मंगेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी

महापारेषणच्या वार्षिक दैनंदिनी व प्लॅनर-२०२५ चे थाटात प्रकाशन

-----------------------------------

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वार्षिक दैनंदिनी, प्लॅनर-२०२४ व सेवाभरती विनियम पुस्तकाचे प्रकाशन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले.

 

यावेळी महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर, संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे, मुख्य अभियंता श्री. सुनील सूर्यवंशी, श्री. किशोर गरुड, श्री. भूषण बल्लाळ, कंपनी सचिव विनीता श्रीवाणी, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री. नागसेन वानखेडे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. मंगेश शिंदे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील, उपमुख्य सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी श्री. किशोर पाटील, श्री. प्रशांत गोरडे, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. नितीन कांबळे, श्री. अभय रोही, शिष्टाचार अधिकारी श्री. सतीश जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, श्रीमती रेणुका नाटके उपस्थित होते.

याप्रसंगी महापारेषण कंपनीच्या ब्लॉग व लिंक्डइन या सोशल मीडियाचे अनावरणही डॉ. संजीव कुमार यांनी केले. याप्रसंगी विनाअपघात सेवा बजावल्याबद्दल श्री. संजय भगत व श्री. कमलेश यादव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी केले.

------

महापारेषणचा जनसंपर्क विभाग आघाडीवर

------

महापारेषण-२०२४ च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेला पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने सर्वोत्कृष्ट तीन पुरस्कार मिळाले. तसेच पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर व भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला. यावर्षी महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने कंपनीचा स्वतंत्र https://mahatransco.blogspot.com/ ब्लॉग सुरु केला आहे. नोकरभरतीच्या जाहिराती व अपडेट माहितीसाठी https://www.linkedin.com/in/maha-transco/ हा लिंक्डइन प्लॅटफॉर्मही सुरू केला आहे. वेबसाईटसह एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेडस, युट्यूब, टेलिग्राम चॅनेलसह सर्वाधिक सोशल मीडियावर असणारी महापारेषण ही पहिली कंपनी ठरली आहे. महापारेषणचा स्वतंत्र पॉडकास्ट चॅनेलही लवकरच सुरू होणार आहे.

 

Comments

Popular posts from this blog

संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा प्रसार करा : श्री. सुगत गमरे