संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा प्रसार करा : श्री. सुगत गमरे
मुंबई : महापारेषणने वांद्रे येथे आयोजिलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी विजेत्यांसमवेत महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे, मुख्य अभियंता श्रीमती जुईली वाघ, श्री. सुनील सूर्यवंशी, श्री. कैलास कणसे, श्री. मंगेश शिंदे, श्री. राजू गायकवाड, श्री. भरत पाटील, श्री. नितीन कांबळे.
---------------------
संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा प्रसार करा : श्री. सुगत गमरे
----------------
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा
---------
मुंबई, दि. २४ : `शासकीय कामकाजाबरोबरच दैनंदिन व्यवहारातही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा जास्तीत-जास्त वापर करावा. तसेच मराठी संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा`, असे आवाहन महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी वांद्रे येथील प्रकाशगड इमारतीच्या सभागृहात आयोजिलेल्या अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात श्री. सुगत गमरे बोलत होते. याप्रसंगी संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण, संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकर, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती अंजू गुप्ता, मुख्य अभियंता श्रीमती जुईली वाघ, श्री. सुनील सूर्यवंशी, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री. कैलास कणसे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. मंगेश शिंदे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील, मुख्य विधी सल्लागार डॉ. कीर्ती कुळकर्णी, मराठी भाषा समन्वय अधिकारी श्री. नितीन कांबळे, उपमहाव्यवस्थापक (मा.सं. आस्थापना) श्री. अभय रोही उपस्थित होते.
श्री. सुगत गमरे पुढे म्हणाले, `मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी दैनंदिन जीवनातही मराठीचा वापर करावा. मराठी भाषेच्या प्रसारासाठी महापारेषणने म्हणी स्पर्धा, चरित्रवाचन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. या सांस्कृतिक कलागुणांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागते.`
यावेळी नाट्यअभिनेत्री श्रीमती मधुरा वेलणकर-साटम यांचा अस्स्ल मराठमोळा मधुरव (बोरू ते ब्लॉग) हा दर्जेदार कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी मराठी भाषा समन्वय अधिकारी तथा उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. नितीन कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रितेश चौधरी व श्रीमती प्राजक्ता मदाने यांनी केले. श्री. महेश आंबेकर यांनी आभार मानले.
---------------
महापारेषणमध्ये नावीण्यपूर्ण संकल्पनांवर भर
-----
महापारेषणमध्ये विविध नावीण्यपूर्ण संकल्पना राबविण्यामध्ये संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे नेहमी अग्रेसर असतात. दरवर्षी मराठी भाषा दिनाला विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. विशेषतः महापारेषणचा वर्धापनदिन अनोख्या पध्दतीने करण्यावर श्री. गमरे यांचा विशेष भर असतो. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली व संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापारेषणने विविध पुरस्कार मिळविले आहेत.
---------------
निकाल पुढीलप्रमाणे :
मराठी म्हणी स्पर्धा : अनिल मांढरे (प्रथम), पराग पाटील (व्दितीय)
चरित्र वाचन स्पर्धा : सीमा डुबेवार (प्रथम), रितेश चौधरी (व्दितीय)
वादविवाद स्पर्धा : माहिती व तंत्रज्ञान विभाग (प्रथम), तांत्रिक विभाग-२ (व्दितीय)
Comments
Post a Comment