मुंबई : महापारेषणच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त
आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात बोलताना
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार. शेजारी संचालक (संचलन)
श्री. सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प)
श्री. अविनाश निंबाळकर, संचालक (वित्त) श्रीमती
तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव
संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने, कार्यकारी संचालक (राज्य भार प्रेषण
केंद्र) श्री. शशांक जेवळीकर
-----------
मुंबई : महापारेषणच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त
आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात सेफ्टी
मॅन्युअल व डिझास्टर मॅन्युअलचे प्रकाशन करताना महापारेषणचे अध्यक्ष
व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार व महाराष्ट्र राज्य विद्युत
मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (स्वतंत्र) श्री. विश्वास पाठक. शेजारी संचालक (संचलन)
श्री. सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प)
श्री. अविनाश निंबाळकर, संचालक (वित्त) श्रीमती
तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव
संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने, कार्यकारी संचालक (राज्य भार प्रेषण
केंद्र) श्री. शशांक जेवळीकर
----------------
ऊर्जा क्षेत्रातील
आव्हानांसाठी अधिकाऱ्यांनी
सांघिकपणे काम करावे : डॉ. संजीव कुमार
------------------
महापारेषणचा २० वा वर्धापनदिन
उत्साहात साजरा
---------------------
राज्यस्तरीय पारितोषिक
वितरण समारंभ थाटात
मुंबई, दि. ७ : ``महापारेषणच्या अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी २० वर्षात चांगले काम केले आहे. भविष्यात ऊर्जा क्षेत्रातील आव्हानांना
तोंड देण्यासाठी सांघिकपणे काम केल्यास आपण स्पर्धेतही टिकून राहू``, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी केले.
वांद्रे येथील
बालगंधर्व रंगमंदिरात महापारेषणचा २० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात डॉ. संजीव कुमार बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक
(स्वतंत्र) श्री. विश्वास पाठक, महापारेषणचे संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर, संचालक (वित्त)
श्रीमती तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी तथा
कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने, कार्यकारी
संचालक (राज्य भार प्रेषण केंद्र) श्री. शशांक जेवळीकर उपस्थित होते.
सुरूवातीला मुख्यमंत्री
तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व ऊर्जा
राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महापारेषणच्या
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
वर्धापनदिनाच्या
शुभेच्छा देऊन डॉ. संजीव कुमार म्हणाले, ``महापारेषणने मनोरे
बसविण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला आहे. तसेच महापारेषण लवकरच मोठी नोकरभरती
करणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, समन्वय व प्रशिक्षण दिले पाहिजे.
त्यांना जॉब ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही
महापारेषण कंपनीची लवकरच नोंदणी होणार आहे. क्षेत्रीय कार्यक्षेत्रात लाईन अपग्रेडेशनचा
विषय महत्त्वाचा आहे. त्यामध्येही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांघिक सहभाग नोंदवून
महाराष्ट्राला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा दिला पाहिजे.``
श्री. विश्वास
पाठक म्हणाले, ``देशाचे पंतप्रधान
श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण
केले आहे. भारताची अर्थव्यवस्था आता जगात चौथ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १ ट्रिलियन
अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. सध्या विजेची
मागणी ३० हजार मेगावॅटपर्यंत झाली आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र
फडणवीस यांच्या नेतृत्वात महापारेषणने केलेली प्रगती उल्लेखनीय असून स्पर्धेच्या
युगात सक्षम होण्यासाठी तांत्रिक बदल स्वीकारून महापारेषणने अधिक जोमाने काम करावे.``
प्रास्ताविकात अपर जिल्हाधिकारी
तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता
भिकाने म्हणाल्या, ``२० व्या वर्षात महापारेषण सर्वात ऊर्जावान व सामर्थ्यवान बनला आहे. महापारेषण
ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी आहे. भविष्यात सौर ऊर्जेसाठी आव्हाने स्वीकारली
पाहिजेत. तसेच कंपनीची संस्कृती व कर्मचाऱ्यांमध्ये एकसंघ वातावरण निर्माण
करण्यासाठी सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणे, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कंपनीचा विकास
साधावा, या हेतूने
महापारेषणतर्फे वर्धापनदिन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.`` यावेळी संचालक (संचलन) श्री. सतीश
चव्हाण, संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर, संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती
मुधोळकर, कार्यकारी संचालक (राज्य भार प्रेषण केंद्र) श्री. शशांक
जेवळीकर यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी सेफ्टी मॅन्युअल व डिझास्टर
मॅन्युअलचे प्रकाशन डॉ. संजीव कुमार व श्री. विश्वास पाठक यांच्या हस्ते करण्यात
आले.
ऊन-पावसाची तमा न
बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात
आले. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम
यावेळी सादर केले. जनसंपर्क विभागाच्या समन्वयातून महापारेषणच्या सर्वंकष कार्यावर
प्रकाश टाकणाऱ्या चित्रफितीने वातावरण ऊर्जामय झाले. प्रसिध्द गायिका संजीवनी
भेलांडे व गायक मदन शुक्ला यांच्या गीतांनी कार्यक्रमाला बहार आली.
या सोहळ्याला
राज्यातील विविध परिमंडलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले तर आभार श्री. महेश
आंबेकर यांनी मानले.
Comments
Post a Comment