अपर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा







 अपर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांचा

वाढदिवस सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा

--------

मुंबई, दि. १३ : अपर जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांचा जन्मदिन सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.

 

वांद्रे येथील प्रकाशगंगा इमारतीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता (स्थापत्य) श्री. संदीप हाके, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) श्री. राजू गायकवाड, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री. नागसेन वानखेडे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) श्री. नितीन कांबळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील, उपमुख्य दक्षता अधिकारी श्री. प्रशांत गोरडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, संचालक (मानव संसाधन) यांच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती अश्विनी तेरकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

अपर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांनी सुरूवातीपासून सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत अनेक उपक्रम राबविलेले आहेत. मुक्या प्राण्यांचे संगोपन, अपघाती प्राण्यांना रूग्णवाहिका उपलब्ध करून त्यांच्यावर उपचार करून सांभाळ करण्यासाठी त्यांची शिवपूजा ऍनिमल केअर हाऊस, पुणे ही संस्था २०२२ पासून अविरत सेवेत आहे. शिवपूजा फाऊंडेशनमार्फत मुक्या प्राण्यांसाठी निवारा स्थानाची देखील सोय करण्यात आली आहे.

 

सौंदाळा (ता.नेवासा. जि. अहिल्यानगर) येथील २२० के. व्ही. वीज उपकेंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंतनू सूर्यकर यांनी श्रीमती सुचिता भिकाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून `एक पेड मॉं के नाम` या संकल्पनेनुसार शरणपूर वृध्दाश्रमात वृक्षारोपण करून आश्रमातील वृध्द व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

म्हाळस पिंपळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच खडका फाटा येथील आनंद गोशाळेतील ७० देशी गायींना चाऱ्याचे वाटप करण्यात आले.

 

४०० के. व्ही. ग्रहण केंद्र विभाग, तळंदगे (जि. कोल्हापूर) येथे व २२० के. व्ही. भेंडा उपकेंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. ४०० के. व्ही. बाभळेश्वर येथेही वृक्षारोपण करण्यात आले.

 

स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी श्रीमती सुचिता भिकाने यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव मंदिरात अभिषेक केला. गोशाळेत चारा वाटप करण्यात आले. पालघर येथे आदिवासी मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. भटक्या कुत्र्यांना व मांजरांना खाऊ देण्यात आला.

 

खारघर येथील इस्कॉन मंदिरात विशेष आरती करण्यात आली. भाविकांना अन्नदान व प्रसादाचे वाटप करण्यात आले. गोशाळेमध्ये देशी गायींना चारा वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचा प्रसार करा : श्री. सुगत गमरे